बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा..

बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा..

कुडाळ /-

आंतरराष्ट्रीय योगादिनाचे औचित्य साधून शिक्षण संस्थेच्या विविध अभ्यासक्रमातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. . सुरुवातीला प्रा.अरुण मर्गज यांनी योगा दिनाचे महत्त्व सांगत योगा हे आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी किती उपयुक्त आहे. याची माहिती दिल्यानंतर विविध योगासने करत योगा दिन साजरा करण्यात आला यावेळी बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेच्या विविध अभ्यासक्रमातील प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते. सोशल डिस्टंसिंग चे सर्व नियम पाळून सदर अंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला . इतर शिक्षक ऑनलाइन पद्धतीने या योगा डे मध्ये सहभागी झाले होते.

अभिप्राय द्या..