कुडाळ शहरात २३ जूनला कै.देवेंद्र संजय पडते यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन..

कुडाळ शहरात २३ जूनला कै.देवेंद्र संजय पडते यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन..

कुडाळ /-

कै.देवेंद्र संजय पडते यांच्या स्मरणार्थ बाजारपेठ मित्रमंडळ कुडाळच्या वतीने बुधवारी २३ जून रोजी सकाळी ८.३० ते १२ वा.या वेळेत कुडाळ येथील सिद्धिविनायक हॉल (रेल्वे स्टेशन रोड) येथे रक्तदान शिबिराचे दात्यास भेटवस्तू देण्यात येणार आहे. कोरोना मुक्त होऊन एक वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती तसेच कोरोना लसीचे दोन डोस घेऊन एक महिना पूर्ण झालेली व्यक्ती रक्तदान करू शकते. कोरोना लसचा एकही डोस न घेतलेली व्यक्ती रक्तदान करू शकते.. नावनोंदणीसाठी भूषण मठकर व सुमेध साळवी यांच्याशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.हे आयोजन कै.देवेंद्र पडते मित्रमंडळ यांच्याकडून करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..