कुडाळ एसटी बस डेपोच्या नजीक ट्रकला अपघात कोणतीही जीवितहानी नाही..

कुडाळ एसटी बस डेपोच्या नजीक ट्रकला अपघात कोणतीही जीवितहानी नाही..

कुडाळ /-

वैभववाडी येथून निघालेला मुंबई- गोवा हायवेवरून कुडाळ शहराच्या दिशेने कुडाळ एसटी बस डेपोच्या नजीकच्या रोडवरून टाटा कंपनीच्या /MH.07-X.1044 या ट्रकला अपघात झाला आहे.या ट्रकमद्धे पूर्णपणे भेलेल्या सिमेंटच्या गोण्या होत्या ट्रकचे स्टेरिंग लॉकझाल्यामुळे चालकाला ट्रक आवरू शकला नाही त्यामुळे रोडच्या साईडला असलेल्या शेळजमिनीत ट्रक कोसळला या ट्रकमद्धे एक ड्रायव्हर एक क्लीनर आणि दोन हमाल होते या अबघतात कोणतीही जीवित हानी झाली नाही.मात्र ट्रकचे बरेच नुकसान झाले आहे असे समजते.हा अपघात सकाळी ८.वाजण्याच्या सुमारास झाला आहे.ट्रकमधील ड्रायव्हर,क्लीनर आणि हमाल हे सुखरूप आहेत.दुसरा ट्रक मागऊन अपघात गाडीतील माला ट्रान्स्फर करण्याचे काम सुरू आहे.

अभिप्राय द्या..