म्हापण बाजारपेठेत अनावश्यक फिरणाऱ्यांवर निवती पोलीसांकडून कडक कारवाई..

म्हापण बाजारपेठेत अनावश्यक फिरणाऱ्यांवर निवती पोलीसांकडून कडक कारवाई..

वेंगुर्ला /-

म्हापण मध्ये कोरोणा चा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याने याच पार्श्वभूमीवर वाढत्या कोरोणाला आळा घालण्यासाठी १२ ते १७ जुन या कालावधी दरम्यान म्हापण बंदचा निर्णय स्थानिक प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. हा निर्णय जाहीर करतानाच अनावश्यक फिरणाऱ्यांवर पोलिसांमार्फत कडक कारवाई करण्यात येईल अशी सुचना सुद्धा ग्रामस्थांना देण्यात आल्या होत्या. त्याच सूचनेवर अंमलबजावणी करत कालपासून म्हापन बाजारपेठेत निवती पोलिसांनी कडक कारवाईला सुरुवात केली आहे.कालपासून जवळपास १६ जणांविरुद्ध निवती पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामुळे आता अनावश्यक फिरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

अभिप्राय द्या..