मालवणच्या “ढोले बाबू” चा कोरोना योद्धा म्हणून शिवसेना नेते तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री उदय सामंत यांच्या वतीने सन्मान…

मालवणच्या “ढोले बाबू” चा कोरोना योद्धा म्हणून शिवसेना नेते तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री उदय सामंत यांच्या वतीने सन्मान…

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते पार पडला सत्कार सोहळा…

मालवण /

सिंधुदुर्ग जिल्हा तसेच जिल्ह्याबाहेर देखील कोणत्याही ठिकाणी उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत त्याठिकाणी अपघातग्रस्त नागरिकांच्या मदतीला मालवण तालुक्यामधील “ढोले बाबू” प्रत्येक ठिकाणी हजर असतात. सावित्री नदी पूल दुर्घटना, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थिती सर्व ठिकाणी “ढोले बाबू” आपले मदतीचे हात विना मोबदला देत असतात.
याच सामाजिक कार्याची दखल घेत शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांनी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री तथा युवासेना प्रमुख नामदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाहीर सत्कार केला. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री उदय सामंत यांच्या वतीने कोरोना सारख्या महामारीच्या काळात आर्थिक मदत म्हणून रोख रुपये २१०००/- देखील देण्यात आले. यावेळी सोबत शिवसेना नेते संदेश पारकर, सतीश सावंत, अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, गीतेश कडू, मालवण तालुकाप्रमुख जि. प. सदस्य हरी खोबरेकर, नागेंद्र परब, राजू परब, सोमा घाडीगांवकर आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..