मळेवाड ग्रामपंचायतच्या विलगीकरण कक्षासाठी गावातील युवकांकडून पीपिई कीट भेट..

मळेवाड ग्रामपंचायतच्या विलगीकरण कक्षासाठी गावातील युवकांकडून पीपिई कीट भेट..

सावंतवाडी /-


मळेवाड ग्रामपंचायतच्या विलगीकरण कक्षासाठी गावातील युवकांकडून पीपिई कीट भेट देण्यात आले आहेत.वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता, कमी लक्षणे असणाऱ्या रुग्णांना विलगी करणात ठेवण्यासाठी गावातील ग्रामपंचायतीनी स्वतःचा स्वतंत्र विलगीकरण कक्ष सुरू करावा अशा सूचना शासनाकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे ने राणी पार्वतीदेवी विद्यालय मळेवाड केंद्र शाळा नंबर 1 मध्ये गाव विलगीकरण कक्ष सुरू केला आहे. या विलगीकरण कक्षात असणाऱ्या रुग्णांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी गावातील खाजगी डॉक्टर भेट देऊन रुग्णांची तपासणी करतात. यावेळी डॉक्टरांच्या सुरक्षतेसाठी गावातील प्रदीप रवींद्र मुळीक, संदीप गुणाजी मुळीक, सुधीर सुधाकर मुळीक या युवकानी पिपीई किट सरपंच हेमंत मराठे यांच्याकडे भेट स्वरूपात सुपूर्द केली आहेत. याबद्दल सरपंच मराठे यानी युवकांचे आभार मानले आहेत. तसेच या कक्षासाठी आणखीनही कोणत्या प्रकारची मदत लागल्यास आम्ही करू असे त्या युवकांनी सांगितले आहे.
फोटो ओळ — सरपंच मराठे यांच्याकडे पीपी किट देताना युवक

अभिप्राय द्या..