वेंगुर्ले पोलिस खात्याच्या वतीने मांडवी बंदरावर बोटीचे प्रात्यक्षिक..

वेंगुर्ले पोलिस खात्याच्या वतीने मांडवी बंदरावर बोटीचे प्रात्यक्षिक..

वेंगुर्ला /-


वेंगुर्ले पोलिस खात्याच्या वतीने वादळी वाऱ्याच्या अनुषंगाने मांडवी बंदरावर (नवाबाग ) बोटीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.सहाय्यक पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज दुपारी मांडवी बंदरावर दोन किमी प्रात्यक्षिक घेण्यात आले.यामध्ये पोलीस उपनिरीक्षक रुपाली गोरड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गौरी,कुंडेकर,पोलिस हवालदार वासुदेव परब,पोलिस नाईक नितीन चोडनकर,दादा परब,पोलिस कॉन्स्टेबल अमर कांडर,परशुराम सावंत,मनोज परुळेकर,खडपकर,तावडे आदी उपस्थित होते.नागरिकांनी वादळी वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर सतर्क रहावे,असे आवाहन ए. पी.आय पाटील यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..