You are currently viewing कसाल वझरेवाडी येथील उत्तम परब फणसझाडावर नैसर्गिक चमत्कार.;फणसावर प्रकटले श्री गणराया..

कसाल वझरेवाडी येथील उत्तम परब फणसझाडावर नैसर्गिक चमत्कार.;फणसावर प्रकटले श्री गणराया..

कुडाळ /-

फळांचा राजा “आंबा “जसा कोकणात पिकतो तसेच फळांचे अनेक प्रकार आहेत त्यामध्ये काजू फणस ,आंबे, केळी, रतांबे (कोकम), जांभूळ, रानमेवा करवंदे, ही कोकणातीलच सर्व फळे आहेत. फणस हे बाहेरून जरी काटेरी असले तरी आत मध्ये रसाळ गरे गोड मुलायम असा खाद्यपदार्थ आहे, नैसर्गिक रित्या फळांमध्ये अनेक प्रकारचे आकार येतात. कसाल वझरेवाडी येथील रहिवासी उत्तम परब यांच्या परसबागेतील असणाऱ्या फणसाच्या झाडाला अशाच प्रकारे एका फणसाच्या झाडातील फणसाने चक्क श्री गणेशाच्या रुपात प्रकटले दिसत असून गणरायाचेच साक्षात दर्शन झाले असे वाटत आहे .या फणसाच्या झाडाच्या फळांचा फोटो येवढा प्रसिद्ध.व्हायरल झाला आहे. या ठीकाणी फोटो काढून घेण्यासाठी हौशी ,कलाकार फोटोग्राफर फोटोसाठी सरसावले आहेत तर काहीजण दर्शन घेऊन जात आहे..त्यामुळे वझरेवाडीमधील रहिवासी उत्तम परब यांच्या कडे श्री गणेश महाराजांनीच दर्शन दिले आहे .असे जनतेतून प्रतिक्रिया उमटत आहे.. दरम्यान आता हा फणस कधी मोठा होतो व त्याचा आकार बदलतो का ? हे पाहणे महत्वाचे आहे.तसेच 24 जून रोजी सुहासिनी भगिनींसाठी वटपौर्णिमा हा मोठा धार्मिक सण असल्याने हा गणेश रुपी आकाराचा फणस झाडावरच रहातो का ते पहाणेही तितकेच गरजेचे आहे.

अभिप्राय द्या..