विश्व हिंदु परिषद प्रखंड – वेंगुर्लेच्या वतीने खानोली व वेतोरे आरोग्य केंद्रांना पीपीई कीट प्रदान…

विश्व हिंदु परिषद प्रखंड – वेंगुर्लेच्या वतीने खानोली व वेतोरे आरोग्य केंद्रांना पीपीई कीट प्रदान…

वेंगुर्ले /-

मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते व शास्त्रज्ञ डाॅ. दिलीप पवार यांच्या माध्यमातून व विश्व हिंदु परिषदेच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यातील खानोली व वेतोरे आरोग्य केंद्रांना पीपीई कीट प्रखंड – वेंगुर्ले चे अध्यक्ष अरुण गोगटे व महामंत्री आपा धोंड यांच्या हस्ते देण्यात आली. ग्रामीण भागात आरोग्य सेवकांना विलगीकरण कक्षात जाताना तसेच स्वॅबटेस्ट घेताना पीपीई कीट अत्यावश्यक असताना शासनाकडून मुबलक प्रमाणात पीपीई कीटचा पुरवठा होत नव्हता, ही अडचण लक्षात घेऊन विश्व हिंदु परिषद प्रखंड – वेंगुर्ले च्या वतीने खानोली व वेतोरे आरोग्य केंद्रांना पीपीई कीट देण्यात आली. यावेळी भाजपाचे प्रदेश का.का.सदस्य शरदजी चव्हाण, जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके, जि.का. का.सदस्य साईप्रसाद नाईक व बाळा सावंत, ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर, माजी सरपंच शामसुंदर मुननकर , ओंकार चव्हाण, किसान मोर्चा चे बापु पंडित , महिला तालुका अध्यक्षा स्मिता दामले , ता.उपाध्यक्ष दिपक नाईक, वेतोरे सरपंच राधिका गावडे , सो.सा.चेअरमन विजय नाईक , दिलीप मुळीक , आरोग्य सेवीका आर. सी. नवार , CHO डाॅ. आर. जे.फर्नांडिस , आरोग्यसेवक एम.बी.काळसेकर , आरोग्य सेवीका जी.के.नाईक , आशा स्वयंसेवीका – वर्षा परब , शुभांगी मुननकर , संपदा सामंत . अटेंडंट पी.बी.भगत . तसेच वेतोरे आरोग्य सेवीका एस्. जी मसगे व एस्. एस्. कांदळगांवकर इत्यादी उपस्थित होते .

अभिप्राय द्या..