ऐन पावसाच्या तोंडावर सावंतवाडी शहरात पाणीटंचाई.

ऐन पावसाच्या तोंडावर सावंतवाडी शहरात पाणीटंचाई.

सावंतवाडी /-

सध्या सावतवाडीत नागरीकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.नगर पालिकेच्या इतिहासात प्रथमच पाण्याची ओरड ऐकू येत आहे.पुण्यश्लोक बापुसाहेबांच्या प्रयत्नामुळे केसरीतुन चिवारटेकडीवर पाणी आणण्यात आले. गुरुत्वाकर्षणाद्वारे आतापर्यंत अविरत पाणी पुरवठा होत होता. मात्र भाजपाने न.पा.चा ताबा घेतला आणि सावंतवाडीतील नागरिकांना या वर्षी पाणी टंचाईला सामोरे जावे लागले आहे. पाईपलाईन फुटण्याचा सपाटाच लागला. त्यामुळे संशय व्यक्त होत आहे.

उभाबाजार, वैश्यवाडा, सबनिसवाडा, खासकिलवाडा, पोलीस लाईन, स ईवाडा भागात आलटून पालटून पाण्याची समस्या निर्माण होत आहेत. यापूर्वी पाण्यासंदर्भात न.पा. कडून नागरीकांना सुचना देण्यात येत होत्या मात्र आता तेही बंद झाले,सत्ताधारी आणि विरोधक एकामेकांनवर कुरघोडी करण्यातच लक्ष देत असल्यामुळे नागरीकांच्या गरजां तसेच समस्या सोडविण्यासाठी दोघांनाही लक्ष देता येत नाही.नगराध्यक्ष आणि पाणीपुरवठा सभापतींच्या वार्डातही सध्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. मात्र तेही सध्या दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

सावंतवाडीच्या इतिहासात प्रथमच पाईप फुटण्याचा सपाट लागला,असल्याने संशय व्यक्त होत असून सत्ताधाऱ्यांबाबत तीव्र रोष व्यक्त होत आहे. नागरिकांना दुरवरून पाणी आणावे लागत आहे. सावंतवाडीतील न. पा. चुकीच्या व्यक्तींकडे गेली अशी चर्चा यामुळे सध्या सुरू असून ते सत्ताधाऱ्यांना येत्या निवडणुकीत त्रासदायक ठरणार एवढे मात्र नक्की आहे.

अभिप्राय द्या..