पालकमंत्री,खासदार,आमदार हेच जिल्ह्यातील जनतेसाठी ठरले “देवदूत”.;शिवसेना ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर

पालकमंत्री,खासदार,आमदार हेच जिल्ह्यातील जनतेसाठी ठरले “देवदूत”.;शिवसेना ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर

कुडाळ /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्याच्या परिस्थितीत रुग्णांची संख्या वाढत असताना पालकमंत्री, खासदार आणि दोन्ही आमदार हे शिवसेनेचे चारही शिलेदार आपल्या कार्यातून जिल्हा वासियांसाठी खऱ्या अर्थाने देवदूत ठरले आहेत.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणुन योग्य आणि नियोजनबद्ध कोविड सेंटर ठिकठिकाणी चालू केल्यामुळे रुग्णांना चांगल्या पद्धतीची सुविधा उपलब्ध झाली आहे.
आमदार महोदयांनी सर्वप्रथम आपल्या महाविद्यालयात कोविड सेंटर चालू केले. त्यानंतर कुडाळ येथील महिला व बालरुग्णालयाच्या नूतन इमारतीत आणि नेरूर येथील इंगेश रुग्णालयात कोविड सेंटर सुरु केले. फक्त सुरू न करता त्याठिकाणी बेड देखील तातडीने उपलब्ध केले. यासाठी आमदार वैभव नाईक यानी विशेष मेहनत घेतली.
जिल्ह्यात ऑक्सिजन चा तुटवडा मोठ्या प्रमाणावर होत होता. यावर देखील तातडीने ऑक्सिजन प्लांट ची उभारणी करून तोडगा काढला. राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते या ऑक्सिजन प्लांट चे उद्घाटन करण्यात आले. आमदार वैभव नाईक यांची लोकांसाठी धडपड पाहून खुद्द मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा “वैभव तुझ्यासाठी काय वाट्टेल ते” अशा शब्दात पाठीवर कौतुकाची थाप दिली.
जिल्ह्यात लसींचा तुटवडा होताच लसीही उपलब्ध करून दिल्या. रुग्णांच्या इलाजासाठी लागणार्‍या मशीन्स ही उपलब्ध करून दिल्या… एकंदरीत आपल्यापुढे आलेल्या संकटाला धीरोदात्तपणे सामोरे जात जनतेसाठी आपण कायम उपलब्ध आहोत याची प्रचिती आपल्या कामातून दिली. आणि लोकप्रतिनिधी कसा असावा याचं उदाहरण दिलं
आपण सर्वांनी केलेल्या या धडपडीसाठी जनतेचा आशीर्वाद नेहमी आपल्या पाठीशी नक्कीच राहील यात शंका नाही.

अभिप्राय द्या..