आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून जिल्हा खनिकर्म अंतर्गत मसुरे प्रा. आ. केंद्रासाठी नवीन रुग्णवाहिका मंजूर..

आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून जिल्हा खनिकर्म अंतर्गत मसुरे प्रा. आ. केंद्रासाठी नवीन रुग्णवाहिका मंजूर..

मालवण /-

माजी जी. प.अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, माजी पं. स. सदस्य छोटू ठाकूर, मर्ढे सरपंच संदीप हडकर, शिवसेनेचे माजी विभागप्रमुख राजा कोरगावकर, युवासेनेचे अमित भोगले यांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका देण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन आमदार वैभव नाईक यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा करून मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन रुग्णवाहिका मंजूर करून दिली आहे. सिंधुदुर्ग खनिकर्म विभागाच्या निधीतून हि रुग्णवाहिका देण्यात आली आहे. सिंधुदुर्ग मध्ये रुग्णवाहिका दाखल झाली असून लवकरच मसुरे प्रा.आ.केंद्राकडे सुपूर्त करण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांना याचा लाभ होणार आहे.

अभिप्राय द्या..