You are currently viewing कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळताच नेरूर घोघळवाडी येथील एकाची आत्महत्या.;कुडाळ पोलिस ठाण्यात नोंद..

कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळताच नेरूर घोघळवाडी येथील एकाची आत्महत्या.;कुडाळ पोलिस ठाण्यात नोंद..

कुडाळ /-


कुडाळ तालुक्यातील नेरूरपार घोघळवाडी महेश यशंवत नाईक, वय 34 कोरोना पॉझिटिव्ह झाल्यामुळे त्याने मानसिक खच्चीकरणातूने नेरूर कर्ली नदीच्या पाण्यात नेरूरपारच्या पुलावरून खाली पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. या घटनेची फिर्याद साबाजी राजाराम नाईक यांनी कुडाळ पोलिसात दिली आहे.महेश यशंवत नाईक, वय 34 वर्षे, रा. नेरूरपार घोघळवाडी, हा दि 04 जून रोजी कोरोना पॉझिटिव्ह आला होता . यानंतर ५ जून रोजी दुपारी २ वा.चे मानाने घरी कोणाला काही न सांगता निघून गेलेला होता म्हणून वाडीतील लोकांनी त्याचा आजूबाजूला सर्वत्र शोध घेतला परतुं तो मिळून आलेला नव्हता यानंतर ६ जून रोजी दुपारी २ वा.चे मानाने नेरूरपार पुलाचे ब्रिजजवळ कर्ली नदीचे पाण्यात तरंगत असताना मृतदेह आढळून आला. यानंतर गावातील लोकांनी मिळून त्याचा मृतदेह नदीचे काठ्याच्या बाजूला काढून ठेवला. पुलाजवळ त्याचे टाँवेल आढळले होते. महेश नाईक हा दोन दिवसापुर्वी कोरोना पॉझिटिव्ह झाल्यामुळे त्यांने त्या मानसिक खच्चीकरणातूने त्याने नेरूर कर्ली नदीच्या पाण्यात नेरूरपारच्या पुलावरून खाली पाण्यात उडी मारून पाण्यात बुडुन आत्महत्या केलेली आहे. अशी फिर्याद त्याचा भाऊ साबाजी नाईक यांनी कुडाळ पोलिसात दिली आहे. घटनास्थळी पोलिस दयानंद चव्हाण ,विक्रांत तुळसकर यांनी पंचनामा केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा