कोविड १९ लसीकरणासाठी धावली लालपरी..

कोविड १९ लसीकरणासाठी धावली लालपरी..

दोडामार्ग /-

कोविड १९ साठीच्या लसीकरण मोहीमेमध्ये आता ४५ वर्षांवरील सगळ्यांना प्राधान्यक्रमाने लस देण्यात येत आहे.जिल्हा परीषद आरोग्य विभाग व तालुक्यात कार्यरत आरोग्य कर्मचारी यांच्या एकत्रित नियोजनातून गावागावात कोविड लसीकरण जोर धरत आहे.

सदरील लसीकरण हे ऑनलाईन असल्याने ज्या गावांत नेटवर्क नाही अशा भागातील लोकांचे लसीकरण करताना बऱ्याच अडचणी येत होत्या,मात्र या अडचणींवर मात करत आम.नितेशजी राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हा परीषद आरोग्य व शिक्षण सभापती डॉ.अनिषा दळवी यांनी तालुक्यात प्रथमच भारतीय जनता पार्टी दोडामार्ग व ग्रूप ग्रामपंचायत बोडदे यांच्या एकत्रित प्रयत्नांतून खानयाळे,बोडदे व शिरंगे या गावांतील ४५ वर्षावरील लोकांच्या लसीकरणासाठी एसटी बस उपलब्ध करून दिली.याकामी प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशी व श्री.वैभव पडोळे आगारप्रमुख राज्य परीवहन मंडळ,सावंतवाडी,भाजपा तालुकाध्यक्ष प्रविण गवस उपस्थित होते.

अभिप्राय द्या..