श्री सदगुरू भक्त सेवा न्यास संस्थेने गरजूंना जीवनावश्यक वस्तूचे वाटप..

श्री सदगुरू भक्त सेवा न्यास संस्थेने गरजूंना जीवनावश्यक वस्तूचे वाटप..

कुडाळ /-


काेराेना महामारीचे हे संकट दिवसेंदिवस आपल्या भारत देशामध्ये गंभीर परीस्थिती निर्माण करीत आहे. सर्व सामान्य जनता देशाेधडीला लागण्याची वेळ निर्माण झाली आहे.त्यातूनच कोराेना रुग्णांच्या वाढत्या संख्येंमुळे व मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. आपला सिधुंदुर्ग जिल्हासुद्धा रेड झाेन म्हणून घोषित झाल्याने आणि सरकारने कडक निर्बंध करुन लाँकडाऊन 15 जून पर्यत वाढविला आहे. आधीच अनेकांचे राेजगार
नाेक-या गेलेल्या असून अनेक घरातील कर्त्या पुरूषांचा या महामारीने मृत्यू होऊन त्यांचे संसार उघडयावर पडल्यामुळे त्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा कठीण प्रसंगी समाज बांधिलकीचे भान ठेवून श्री श्री 108 महंत मठाधिश प.पू.सदगुरू श्री गावडे काका महाराज संचलित श्री सदगुरू भक्त सेवा न्यास माड्याचीवाडी या संस्थेच्या वतीने अनेक गरीब गरजू* कुटुबींयाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सावंतवाडी तालुक्यातील कारीवडे या गावी करण्यात आले. या वेळी संस्थेचे सचिव श्री.राकेश केसरकर, श्री.राजेद्र वाळके, श्री.रमाकांत उर्फ बाळा मेस्ञी,श्री तुकाराम उर्फ बंटी श्री.आमाेणेकर, श्री.शशिकातं तायशेटे,श्री.शांताराम मेस्ञी,श्री.कृष्णा मेस्ञी, श्री.मनिष नाईक, साै ञिवेणी आमाेणेकर,साै रुपाली मेस्ञी,छाया हनफडे उपस्थित हाेत्या. या वेळी ऱमाकांत उर्फ बाऴा मेस्त्री यांनी काेराेना महामारीच्या या संकटाच्या काळात प्रत्येकाने आपली व आपल्या कुटूंबाची काळजी शासकीय नियमांचे पालन करून घ्यावी.असे आवाहन केली.

अभिप्राय द्या..