घर तिथे शोष खड्डा योजनेचा बांदिवडे खुर्द- कोईल येथे शुभारंभ!

घर तिथे शोष खड्डा योजनेचा बांदिवडे खुर्द- कोईल येथे शुभारंभ!

मसुरे /-

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजने अंतर्गत जी प आदर्श ग्राम योजनेच्या संकल्पनेतून जलशक्ती अभियान २०२१-२२ अंतर्गत घर तिथे शोष खड्डा योजनेचा शुभारंभ ग्रामपंचायत बांदिवडे खुर्द- कोईल येथे माजी वित्त व बांधकाम सभापती तथा जी प सदस्य जेरॉन फर्नांडिस यांच्या हस्ते करण्यात आला. गावाने शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आवाहन यावेळी जेरॉन फर्नांडिस यांनी केले. यावेळी सरपंच रमेश तोरसकर, उपसरपंच पांडुरंग भांडे, ग्रामसेवक व्ही. व्ही. रावले, ग्राप सदस्या नम्रता नार्वेकर तसेच ग्रामस्थ, सदस्य कर्मचारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..