सिंधुदुर्ग /-
रेडझोनमध्ये गेलेल्या सिंधुदुर्गच्या मदतीला ‘कोकण- म्हाडा’ ने आता मदतीसाठी धाव घेतली आहे.तसे संकेत राष्ट्रवादीचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहेत(डेडिकेटिव्ह हॉस्पिटलच्या प्रस्तावावर सह्या करून गृहनिर्माण खात्याचे प्रधान सचिव श्रीनिवास यांच्याकडे सुपूर्द करताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांना सिंधुदुर्गवासीयांसाठी ५० बेडचे विशेष डेडिकेटिव्ह कोविड हॉस्पिटल उभारणार असल्याचे सांगितले.राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची सिंधुदुर्गवासीयांसाठी विशेष भेट राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या प्रयत्नांना अभूतपूर्व यश मिळाले आहे.जिल्हा क्रीडा संकुलातील पॅव्हेलियन हॉलमध्ये उभारणार हॉस्पिटलची उभारणी होणार आहे.ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसह ५० बेड उपलब्ध होणार आहेत.हा महाराष्ट्रा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.