वेंगुर्ले भाजपाच्या वतीने मठ येथील वादळग्रस्तांना मदत..

वेंगुर्ले भाजपाच्या वतीने मठ येथील वादळग्रस्तांना मदत..

वेंगुर्ला /-

वेंगुर्ले भाजपाच्या वतीने मठ येथील वादळग्रस्तांना मदत
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या यशस्वी सत्पवर्षपुर्ती निमित्त भाजपा च्या वतीने सेवा सप्ताहाचे आयोजन केले आहे.या सेवा सप्ताहात विविध सेवा कार्य हाती घेऊन सत्पवर्षपुर्ती साजरी करण्यात येत आहे.याच सेवा सप्ताहाच्या निमित्ताने वेंगुर्ले भाजपाच्या वतीने तालुक्यातील मठ ग्रामपंचायत हद्दीत चक्रीवादळग्रस्तांना वस्तु स्वरुपात मदत करण्यात आली. मठ शिवाजी चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई व वेंगुर्ले तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते नुकसानग्रस्त ग्रामस्थांना पाण्याच्या टाक्या व ताडपत्र्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी तालुका कार्यकारिणी सदस्य रविंद्र शिरसाठ, युवा नेते अजित नाईक,बुथप्रमुख अनिल तेंडोलकर, युवा मोर्चाचे समिर नाईक,प्रशांत बोवलेकर,सुनिल तेंडोलकर,प्रदिप मठकर,दादा मोबारकर,सौरभ परब,नितीश कांबळी,शरद कांडरकर आदी उपस्थित होते.यावेळी संतोष परब व सुदेश राणे यांना पाण्याच्या टाक्या व प्रकाश मठकर,जितेंद्र धुरी,बाळु धुरी, प्रशांत बोवलेकर,चंद्रशेखर गावडे यांना ताडपत्र्या
यांचे वाटप करण्यात आले.
वेंगुर्ले भाजपाच्या वतीने सेवा सप्ताह अंतर्गत कोव्हिड योद्ध्यांचा सन्मान,तौक्ते चक्रिवादळ ग्रस्तांसाठी मदत,स्वच्छता मोहीम,वृक्षारोपण , लसीकरणाच्या ठिकाणी नागरिकांना काॅफी व बिस्किटं वाटप, दिव्यांग सेवा इत्यादी सेवाभावी उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत.

अभिप्राय द्या..