रत्नागिरी /-

रत्नागिरी जिल्ह्यात कडक लॉकडाऊनचा निर्णय जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी घेतला आहे. 2 जूनच्या मध्यरात्रीपासून अर्थात 3 जूनपासून सुरू होणार हा लॉकडाऊन 9 जूनपर्यंत असणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, यापूर्वी 2 जून ते 8 जून अशी लॉकडाऊनची तारीख होती. पण, लोकांना वेळ मिळावा, कुठंही गोंधळ होऊ नये या दृष्टीनं 3 ते 9 जूनच्या कालावधीत जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार आहे. यावेळी जिल्हावासियांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे

◼️ 3 जून ते 9 जून दरम्यान खालील महत्त्वाचे नियम असणार लागू :

▪️ सर्व प्रकारची दुकानं बंद, केवळ दुधाची 11 वाजेपर्यंत होम डिलिव्हरी होणार
▪️ जिल्ह्याच्या सीमा बंद; प्रवेशासाठी आरटीपीसीआर टेस्ट अनिवार्य
▪️ जिल्ह्यात प्रवेशासाठी आता ई पास अनिवार्य
▪️ सर्व प्रकारची खासगी, सरकारी वाहतूक बंद
▪️ अत्यावश्यक सेवेसाठी केवळ एसटी सुरू राहणार
▪️ बँक आणि वित्तीय संस्था कामकाज शेतकऱ्यांचा विचार करता सुरू राहणार; केवळ 10 टक्के उपस्थिती राहणार
▪️ बँक, वित्तीय संस्था 2 वाजेपर्यंत सुरू राहणार; वित्तीय संस्थांमध्ये केवळ शेतकऱ्यांशी संबंधित आर्थिक व्यवहार सुरू राहणार
▪️ एमआयडीसीमधील अत्यावश्यक सेवेत नसेलेले उद्योग बंद राहणार
▪️ सर्व खासगी कार्यालयं बंद, शासकीय कार्यालयांमध्ये 15 टक्के उपस्थिती; केवळ अत्यावश्यक सेवेतील सरकारी कार्यालयं 15 टक्के उपस्थितीसह राहणार सुरू
▪️ जिल्ह्यातील पेट्रोल पंप 5 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहणार; मालवाहतुकीसाठी हायवेवरील पेट्रोल पंप मात्र 24 तास सुरू राहणार
▪️ बियाणं, खते, किटकनाशके यांची दुकानं ठराविक वेळेमध्ये सुरू राहणार
▪️ हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार बंद; होम डिलिव्हरी देखील बंद
▪️ हॉटेल्स, रेस्टॉरंटच्या होम डिलिव्हरीबाबत काही दिवसानंतर निर्णय
▪️ चिकन, मटन, मच्छिची, दुकानं बंद
▪️ मेडिकल दुकानांमध्ये इतर सामानाची विक्री झाल्यास 10 हजारांचा दंड
▪️ लग्नाच्या ठिकाणी कॉन्स्टेबल, तलाठी आणि व्हिडीओग्राफर असणार; केवळ 25 जणांची उपस्थिती तर अँन्टिजेन टेस्ट अनिवार्य
▪️ रेल्वेनं येणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्टेशन्सवर कोरोना चाचणी होणार
▪️ शासकीय बांधकामं वगळता इतर सर्व प्रकारचे कामकाज बंद राहणार
▪️ लसीकरण सुरू राहणार; त्यामध्ये कोणतीही बाधा येणार नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page