आरोग्य मंञी ना.राजेश टोपे लवकरच सिंधूदूर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार.;राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत.

आरोग्य मंञी ना.राजेश टोपे लवकरच सिंधूदूर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार.;राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत.

सिंधुदुर्ग /-


सिंधूदूर्ग जिल्ह्य़ातील वाढती कोरोना रूग्ण संख्या तसेच अपुरी आरोग्य यंञणा याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.अमित सामंत यांनी तातडीने मुंबई येथे आरोग्य मंञी राजेश टोपे यांची भेट घेतली व जिल्ह्यातील आरोग्य यंञणे बाबत सविस्तर चर्चा करून लेखी निवेदन दिले.आणी प्रत्यक्ष सिंधूदूर्ग जिल्ह्य़ात येऊन आरोग्य यंञणेची पहाणी करण्याची विनंती केली. तसेच सिंधूदूर्ग जिल्ह्य़ात वाढती रूग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी लवकरच तज्ञ डाँक्टरांचे पथक सिंधूदूर्गात पाठवावे अशी मागणी केली.
आरोग्य मंञी नाम.श्री राजेश टोपे यांनी ही विनंती तात्काळ मान्य करून लवकरच सिंधूदूर्ग जिल्ह्य़ातील आरोग्य यंञणेची पहाणी करण्यासाठी येणार असल्याचे सांगून जिल्ह्य़ातील वाढत्या कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी त्वरित डाँक्टरांचे पथक सिंधूदूर्गात पाठविण्यात येईल असे आरोग्य मंञी राजेश टोपे यांनी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांना सांगितले.

अभिप्राय द्या..