दोडामार्ग पोलिसांनी दारुसह पकडला १ लाख ८६ हजाराचा मुद्देमाल

दोडामार्ग पोलिसांनी दारुसह पकडला १ लाख ८६ हजाराचा मुद्देमाल

पेट्रोलींग दरम्यान करण्यात आली कारवाई

दोडामार्ग /-

दोडामार्ग पोलिसांनी आज अवैध होणाऱ्या दारुवाहतुकी विरुद्ध मोठी कारवाई केली.पोलीस पेट्रोलिंग दरम्यान आधीच गोपनीय माहिती मिळाल्या प्रमाणे सेन्ट्रो कार (एम एच ०९ ए क्यू ७०५०) हिची झाडाझडती घेतली असता गोवा बनावटीच्या विविध ब्रॅण्ड ची सुमारे ६१५६०/- रुपये किमतीची दारू सापडून आली. याविरुद्ध कारवाई करताना गाडीसह १८६५६०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दारुवाहतुक प्रकरणी तुकाराम वैजू सुपल (२७) रा. तुर्केवाडी चंदगड व वैभव विठोबा चव्हाण (२७) रा. कुरकुंडी,चंदगड यांना अटक करून त्यांच्यावर र. न. ७८/२०२१ कलम महा. दारूबंदी अधि. कलम ६५ (अ) (ई).८१.८३ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अभिप्राय द्या..