खारेपाटण मध्ये ४२हजारांची दंडात्मक कारवाई.;कोव्हीड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना प्रांताधिकारी, तहसीलदारांचा दणका..

खारेपाटण मध्ये ४२हजारांची दंडात्मक कारवाई.;कोव्हीड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना प्रांताधिकारी, तहसीलदारांचा दणका..

कणकवली /-

प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार रमेश पवार यांच्या पथकाने खारेपाटण बाजारपेठेत कोव्हीड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 4 दुकानदारांवर प्रत्येकी 10 हजार प्रमाणे 40 हजार व दोन हॉटेल व्यावसायिकांवर प्रत्येकी 1 हजार प्रमाणे एकूण 2 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली. प्रांताधिकारी राजमाने, तहसीलदार पवार यांनी आज सकाळी खारेपाटण बाजारपेठेत सरप्राईज व्हिजिट दिली. यावेळी कोव्हीड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 4 दुकानदारांना प्रत्येकी 10 हजार दंड ठोठावला. तर दोन हॉटेल व्यावसायिकांना प्रत्येकी 1 हजार दंड ठोठावला. यावेळी सरपंच रमाकांत राऊत, मंडळ अधिकारी यादव, तलाठी सिंगनाथ उपस्थित होते.

अभिप्राय द्या..