जिल्ह्यातील सर्व केमिस्ट व्यावसायिक व कर्मचाऱ्यांचे होणार प्राधान्याने लसिकरण.;पालकमंत्री उदय सामंत

जिल्ह्यातील सर्व केमिस्ट व्यावसायिक व कर्मचाऱ्यांचे होणार प्राधान्याने लसिकरण.;पालकमंत्री उदय सामंत

कुठलेही बेकरी प्रोडक्ट मेडिकल स्टोअर्समधून विक्री केल्यास कारवाई होणार ;पालकमंत्र्यांची घोषणा

सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्गात कोरोना महामारीने खुप मोठे थैमान घातलेय. यामुळे आता जिल्हा कोरोना रुग्णांच्या बाबतीत ‘रेड झोन’ मध्ये जावून पोहोचलाय. परंतु याही स्थितीत जिल्ह्यातील सर्व केमिस्ट व्यावसायिक व त्यांचे कर्मचारी फ्रंट लाईन हेल्थ वर्कर प्रमाणे काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांचे तातडीने कोविड वॅक्सिनेशन करण्यात यावे, अशी मागणी सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट केमिस्ट अॕण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आनंद रासम, कार्यकारी सदस्य दयानंद उबाळे व विजय घाडी यांनी ओरोस येथे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत व जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे आज दि. २९ मे रोजी केली होती. ही मागणी पालकमंत्री उदय सामंत यांनी तात्काळ मान्य करून संबंधित अधिकारी DHO तसेच जिल्हा मुख्याधिकारी यांना याची तात्काळ कार्यवाही व्हावी, असे आदेश दिले आहेत.

यासाठी आमदार वैभव नाईक यांनी विशेष सहकार्य केले होते. ही मागणी मान्य करून पालकमंत्र्यांनी काही मौलिक सूचना केल्या. यामध्ये उद्यापासून जिल्हयातील औषध विक्रेत्यांच्या दुकानामध्ये कुठल्याही प्रकारची कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम, बिस्किट व इतर कुठलेही बेकरी प्रॉडक्ट विक्री करू नयेत. तसेच यापुढे या पदार्थांची मेडिकल स्टोअर्समध्ये विक्री करताना आढळल्यास त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल, अशी पालकमंत्र्यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..