कुडाळमद्धे विना मास्क फिरणाऱ्यांना पोलीसांचा दणका.;१० वाहन चालकांसोबत एका दुकानदारावर दंडात्मक कारवाई..

कुडाळमद्धे विना मास्क फिरणाऱ्यांना पोलीसांचा दणका.;१० वाहन चालकांसोबत एका दुकानदारावर दंडात्मक कारवाई..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यातील पणदूर बाजारपेठेत विणा मास्क असलेल्या एका दुकानदारावर व विनाकारण विना मास्क फिरणाऱ्या दहा वाहन चालकांवर कुडाळ पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. कुडाळ पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे, वाहन चालक मायकल डिसोझा, वाहतूक पोलीस संभाजी पाटील, होमगार्ड गंगावणे या पथकाने ही कारवाई केली.कुडाळ तालुक्यात दिवसागणिक कोरोना बाधित रुग्णाची संख्या वाढत आहेत. त्यामुळे पणदूर गावचे सरपंच दादा साईल यांनी कुडाळ पोलिसांना ग्रामीण भागावरही लक्ष द्या, अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती. त्याची दखल घेत शनिवारी कुडाळ पोलिसांच्या पथकाने विनामास्क मालाची विक्री करणाऱ्या दुकानदारा सहित विनाकारण विनामास्क फिरणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

अभिप्राय द्या..