वेंगुर्ला /
शिरोडा ग्रामपंचायतीच्या मंगळवारी झालेल्या मासिक सभेत जि. प.आदर्श गाव अंतर्गत उपक्रम राबविण्याचा ठराव घेण्यात आला.शिरोडा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत जिल्हा परिषद आदर्श गाव या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता मी समृद्ध गाव ही संकल्पना राबविण्याच्या दृष्टिकोनातून शोषखड्डे बांधकामाचा उपक्रम जाहीर करण्यात आला आहे. यावेळी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.या वेळी सरपंच मनोज उगवेकर यांनी गावात शंभर टक्के शोषखड्डे पुर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करून हे अभियान यशस्वी करण्याचे व शिरोडा गाव आदर्श गाव म्हणून प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी,सामाजिक संस्था,महिला बचतगट, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी लोकसहभागातून कार्य करण्यास पुढे येण्याचे आवाहन केले.यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन जि. प. सदस्य व माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी व्यक्त केले आहे.