सावंतवाडी /-
महाराष्ट्र दिनानिमित्त श्री शाहू फाऊंडेशन शाहूवाडी – कोल्हापूर यांच्यावतीने प्राथमिक व माध्यमिक शिक्षक अशा दोन गटांमध्ये राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते . या स्पर्धेत प्राथमिक शिक्षक गटातून जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा कुणकेरी नं. १ च्या उपशिक्षिका श्रीम. निता नितीन सावंत यांनी ५२ स्पर्धकांमधून प्रथम क्रमांक प्राप्त केला. स्पर्धेत त्यांनी ‘कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रापुढे निर्माण झालेली नवी आव्हाने’ या विषयावर निबंध सादर केला होता . त्यांच्या या यशाबद्दल कुणकेरी सरपंच विश्राम सावंत ,कोलगाव केंद्रप्रमुख म.ल.देसाई, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजन मडवळ, मुख्याध्यापक विठ्ठल कदम सहकारी शिक्षक व कुणकेरी ग्रामस्थांनी अभिनंदन केले. गेले वर्षभर लाॅकडाऊन कालावधीत विविध संस्था व मंडळानी जिल्हा व राज्यस्तरावर आयोजित केलेल्या स्पर्धात्मक उपक्रमात सहभागी होऊन नीता सावंत यांनी निबंध स्पर्धा, प्रश्नमंजूषा स्पर्धा,कविता लेखन यामध्ये मिळवलेल्या यशाबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.