महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कुडाळ च्या वतीने कुडाळ येथील महिला बाल रुग्णालयाला २ जम्बो ऑक्सीजन सिलेंडर प्रदान..

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कुडाळ च्या वतीने कुडाळ येथील महिला बाल रुग्णालयाला २ जम्बो ऑक्सीजन सिलेंडर प्रदान..

कुडाळ /-

कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयात सुरू असलेल्या कोव्हीड केअर सेंटर ला महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती शाखा कुडाळ च्या वतीने आज दि २० मे २०२१ रोजी दोन जम्बो ऑक्सीजन सिलेंडर प्रदान करण्यात आले या रुग्णालयाचे डॉ प्रमोद वालावलकर यांनी आपत कालिन परिस्थितीसाठी २ जम्बो ऑक्सीजन सिलेडरची मागणी समिती शाखेकडे केली त्याच बरोबर सेंटर मधील एखाद्या पेशंटला इमर्जन्सी ऑक्सीजन द्यायच्या समस्येबाबत कशी धावपळ होते त्यामूळे इमर्जन्सी वापरासाठी संघटनेकडे जम्बो ऑक्सीजन सिलेंडरची मागणी केली होती विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन तालुकाध्यक्ष प्रसाद वारंग यांनी तात्काळ याची दखल घेत

माझी संघटना, माझे कर्तव्य तसेच .माझा समाज, माझी जबाबदारी या भावनेतून आज महिला बाल रुग्णालया ला १८हजार ५०० रु किंमतीचे २ जम्बो ऑक्सीजन सिलेंडर प्रदान केले
रुग्णालयाच्या वतीने डॉ प्रमोद वालावलकर , डॉ गौरव घुर्ये , सानिका सावंत सिस्टर यांनी मागणीची तात्काळ दखल घेतल्या बददल शिक्षक समिती शाखा कुडाळ चे आभार मानले
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती चे राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर ,तालुकाध्यक्ष प्रसाद वारं, शिक्षक नेते शशांक आटक ,सरचिटणीस महेश कुंभार ,कार्याध्यक्ष आनंद नवार ,माजी तालुका सचिव स्वामी सावंत उपस्थित होते.

अभिप्राय द्या..