सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोवॅक्सीनचे 2,200 डोस उपलब्ध.

सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोवॅक्सीनचे 2,200 डोस उपलब्ध.

सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्याकरिता कोवॅक्सीन लसीचे २ हजार २०० डोस प्राप्त झाले आहेत. ज्या नागरिकांना कोवॅक्सीन लसीचा पहिला डोस घेतलेला आहे,त्यांना प्राधान्याने दुसरा दोड देण्याकरिता राखीव आहे. या लसीकरण सत्रामध्ये ४५ वर्षावरील नागरीकांना दुसरा डोस दिला जणार आहे. तसेच आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर्स यापैकी ज्यांनी पहिला डोस घेतला आहे त्यांनाही यावेळी दुसरा डोस दिला जाणार आहे.तरी ज्या नागरिकांना कोवॅक्सीनचा दुसरा डोस देय आहे त्यांनी लसीकरणाच्या ठिकाणी जाऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रजित नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी केले आहे.

संबंधितल लसीकरण केंद्रावर पुढील प्रमाणे उपलब्ध असणार आहे. कणकवली तालुक्यात कासार्डे येथे १६०, फोंडा येथे १२०, देवगड तालुक्यात आयळये येथे १६०, मालवण तालुक्यात चौके येथे १६०, ग्रामिण रुग्णालय पेंडूर-कट्टा येथे १६०, कुडाळ तालुक्यात माणगाव येथे १६०, , जिल्हा सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्गनगरी येथे १६०, वेंगुर्ला तालुक्यात परुळे येथे १६०, आडेली येथे १६०, रेडी येथे १६०, सावंतवाडी तालुक्यात सांगेली येथे १६०, . बांदा येथे १६९ आणि दोडामार्ग तालुक्यात भेडशी येथे १६० व तळकट येथे १६० या प्रमाणे लसी उपलब्ध असणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..