सध्या चाललेल्या कोरोनाच्या महामारीमद्धे सर्व नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी केलं आवाहन..

कुडाळ /-

समस्त कुडाळवासीयांना कुडाळ नगरपंचायत चे नगराध्यक्ष श्री.ओंकार तेली यांनी ०५ वर्षाचा कार्यकाल पुर्ण झाल्याबद्दल नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी आज बुधवारी १२ मे रोजी सर्वांचे आभार मानले आहेत.२०१६ साली झालेल्या कुडाळ नगर पंचायत पंचवार्षिक निवडणुकीत भैरववाडी प्रभाग २ मधून जनतेने नगराध्यक्ष ओंकार तेली यांनां मोठ्या मताधिक्याने निवडून दिले होते.नगरसेवक, सत्ताधारी गटनेता, बांधकाम सभापती नगराध्यक्ष अशी पदे मला नगरपंचायतीच्या पवित्र सभागृहात भूषविता आली.या पाच वर्षांच्या या कार्यकाळात शहराच्या विकासासाठी आवश्यक आणि शक्य ते करण्याचा मी प्रयत्न केला.त्यात मी १०० टक्के यशस्वी झालो असा माझा दावा नाही.पण माझे प्रयत्न १०० टक्के होते असे मी ठामपणे सांगू शकतो.

गेल्या पाच वर्षात माझ्या भैरववाडी पानबाजार प्रभागातील मतदार सभागृहातील माझे सर्व सहकारी सदस्य, तमाम शहरवासीय, नगर पंचायत प्रशासन, पत्रकार बांधव, माझे वरिष्ठ माझा तेली परिवार, मित्रमंडळी या सर्वांचे सहकार्य लाभले. या सर्वांचा तसेच तरुण वयात महत्वाच्या जबाबदाऱ्या देणारे माझे नेते, माझी मुख्यमंत्री सन्मा. श्री. नारायण राणे साहेब, सन्मा. श्री. आमदार नितेश साहेब, सन्मा. माझी खासदार श्री. निलेश राणे यांचा मी विशेष आभारी आहे.असे कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी सांगितले.

कुडाळसारख्या अत्यंत महत्वाच्या आणि मोठा वारसा असलेल्या शहराचा कारभार सांभाळताना अनेक निर्णय घेतले.काही गोड होते तर काही कटू देखील होते.मात्र कटू निर्णय व्यक्तिगत नव्हते. सामाजिक जीवनात आरोप-प्रत्यारोप, टीका टिपण्या होत असतात.मात्र त्या तेवढ्या विषयापुरत्या आणि सामाजिक विषयासाठी होत्या.कुणीही त्या व्यक्तिगत घेऊ नयेत,ही माझी नम्र विनंती आहे.

पुढील पंचवार्षिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत यापूर्वी च जाहीर झाली आहे.आगामी निवडणुक न लढवण्याचा निर्णय मी या आधीच घेतला आहे.सर्व इच्छूकांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.गेली पाच वर्षे माझे व्यक्तिगत भावविश्व समृद्ध करणारी होती.आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल, प्रेमाबद्दल आणि दिलेल्या पाठिंब्याबद्दल ओंकार सुधीर तेली आपल्या सर्वाचा ऋणी आहे.श्री देव कुडाळेश्वर, श्री देव भैरव जोगेश्वरी, श्री देवी सातेरी आपणा सर्वाना सुख, समृद्धी, शांती आणि आरोग्य देवो आणि सध्या चाललेल्या कोरोनाच्या महामारीत सर्व नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन देखील कुडाळ नगराध्यक्ष श्री.ओंकार तेली यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page