कुडाळ /-
शिवसेनेचे ओ .बी.सी. सेल जिल्हाप्रमुख श्री. रुपेश पावसकर यांच्या तर्फे नेरूर गावात ५०० कुटुंबियांना अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप
सध्या जगभरात कोरोनाचे थैमान घातलेले असताना एक मदतीचा हात म्हणून शिवसेना ओ .बी. सी. सेल जिल्हाप्रमुख यांनी नेरूर गावातील ज्या ठिकाणी कोविड रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत अश्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून ओ .बी. सी. सेल जिल्हाप्रमुख श्री. पावसकर यांनी अर्सेनिक अल्बम ५०० गोळ्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी नेरूर सरपंच शेखर गावडे ,ग्रा.वि.अधिकारी वासुदेव कसालकर,आरोग्य विभागाचे श्री. महेश कोचरेकर ,श्रीमती अणसूरकर ,श्री.अरुण चव्हाण ,विजय लाड आदी उपस्थित होते सदर गोळ्या ग्रा.पं .नेरूर देऊळवाडा व आरोग्य विभाग यांचेकडे सुपूर्द करण्यात आल्या.
यावेळी मार्गदर्शन करताना आणखी गोळ्या लागल्यास आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्यात येतील असे आश्वासन श्री.पवासकर यांनी दिले