मराठा समाजाचे आरक्षण कायदा रद्द होणे दुर्दैवी.;सभापती सिद्धेश परब

मराठा समाजाचे आरक्षण कायदा रद्द होणे दुर्दैवी.;सभापती सिद्धेश परब

वेंगुर्ला /-


मराठा समाजाचे आरक्षण कायदा रद्द होणे दुर्दैवी,
मराठा समाज शैक्षणिक व नोकरी-धंद्यात खरोखरच मागासलेला आहे. लाखोंचे मोर्चा काढूनही शासनाला जाग येत नसेल तर इथून पुढे मराठा समाजाच्या वतीने जे पाऊल उचलले जाणार याची कोणालाही पूर्वकल्पना दिली जाणार नाही पुरणाच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच जणांनी आपल्या नोकऱ्या देखील गमावले आहेत तसेच या अगोदर मराठा समाजाच्या वतीने जेवढे मोर्चा काढली गेलेत त्या मोर्चात इतर समाजाच्या लोकांनी देखील सहकार्य केले त्यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करतो, तसेच जेव्हा त्यांना सहकार्य हवे असेल तेव्हा आम्ही देखील त्यांना नक्कीच सहकार्य करणार पण याचा अर्थ असा नव्हे की कोणी पण उठणार आणि आमच्या विरोधात काय पण बोलणार हे आम्ही कदापि सहन करणार नाहीत.
इथून पुढे होणाऱ्या आंदोलना दरम्यान एखादा मराठ्याचा नाहक बळी गेल्यास त्याला सर्वस्व केंद्र सरकार व राज्य सरकार जबाबदार राहतील. मराठा समाज काय करू शकतो हे येणाऱ्या दिवसात नक्कीच दिसेल.श्री सिद्धेश(भाई) विजय परब यांनी अध्यक्ष
मराठा समाज वेंगुर्ला तालुका यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून सांगितले आहे.

अभिप्राय द्या..