तुळस सिध्दार्थनगर भागात वेंगुर्ले भाजपाच्या वतीने येथे जंतूनाशक फवारणी..

तुळस सिध्दार्थनगर भागात वेंगुर्ले भाजपाच्या वतीने येथे जंतूनाशक फवारणी..

वेंगुर्ला /-

भाजपा च्या वतीने जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील तुळस ग्रामपंचायत हद्दीतील सिद्धार्थनगर येथे जंतूनाशक फवारणी करुन निर्जंतुकीकरण करण्यात आले.
तुळस ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच जयवंत तुळसकर यांच्या मागणीनुसार संपुर्ण सिद्धार्थनगर मध्ये फवारणी करण्यात आली. सिद्धार्थनगर मधील दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने खबरदारी म्हणून भाजपा च्या माध्यमातून निर्जंतुकीकरण करण्यात आले. यावेळी तुळस सिद्धार्थनगर मधील शेखर तुळसकर, शंकर बापु तुळसकर, माजी पोलिस पाटील प्रकाश तुळसकर, कृष्णा तुळसकर, अमित म्हापणकर, अनिल तुळसकर, चंदा तुळसकर, धीरज तुळसकर, राजन तुळसकर, किशोर तुळसकर, संतोष तुळसकर तसेच स्वरांजली युवक मंडळाचे कार्यकर्ते उस्फूर्त पणे सहभागी झाले होते. यावेळी भाजपा च्या वतीने निर्जंतुकीकरण फवारणी केल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

अभिप्राय द्या..