वेंगुर्ला /-
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल यांच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा जि. प. विभागाअंतर्गत परबवाडा, उभादांडा, अणसुर, मोचेमाड, आसोली या गावामध्ये कंटेनमेंट झोन असलेल्या ठिकाणी सॅनिटायझर फवारणी करण्याचा शुभारंभ परबवाडा तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुनिल परब यांच्या हस्ते करण्यात आला. यासाठी वेंगुर्ला तालुका प्रतिनिधी गितेश शेणई, सावंतवाडी तालुका प्रतिनिधी अंकित प्रभू आजगावकर, स्वयंसेवक विनायक प्रभु झाटये, विश्राम कोचरेकर, अक्षय कसालकर यांच्या सहकार्यातून हा सामजिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी परबवाडा ग्रामपंचायत सरपंच पपू परब,ग्रामसेवक संदीप गवस,उपसरपंच संतोष सावंत,परबवाडा ग्रा.पंं.सदस्य हेमंत गावडे,आरोग्य अधिकारी सई लिंगवत,आरोग्य सेविका आंबेरकर आदी उपस्थित होते.
या सामाजिक उपक्रमाबद्दल व आपला जीव धोक्यात घालुन केलेल्या सेवेबद्दल प्राणजीवन संस्था पदाधिकारी व स्वयंसेवक यांचे परबवाडा ग्रामपंचायत सदस्य हेमंत गावडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page