दोडामार्ग /-
समाजातील प्रत्येक घटक हा दोडामार्ग मधील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी साहाय्य करत आहे, त्यातूनच शुक्रवारी झालेल्या टाळे बंदीत व्यापाऱ्यांसह सर्वचजण सहभागी झालेले आहे, असा निर्णय तहसीलदार कार्यालय येथे आमदार दिपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत झाला असून, त्यात गोव्यात ये जा करून काम करणाऱ्या नोकरवर्गासाठी त्यांनी एकतर हा कोरोना संसर्ग थांबण्यासाठी टाळे बंदीच्या काळात गोव्यातच राहावे अन्यथा गावात शासना मार्फत केल्या जाणाऱ्या विलगिकरण कक्षात राहावे असे ठरले आहे, मात्र या लोकांची साहानुभूती मिळविण्यासाठी काही लोक या लोकांची माथी भडकवण्याचे काम करत आहेत, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण हे ही आजच्या बैठकीत उपस्थित होते, मात्र त्यांनी अश्या प्रकारे या लोकांचा आपणच कैवारी आहोत या आविर्भावात त्यांच्या नोकऱ्या गेल्यास जाबाबदार कोण असे स्टेटमेंट देणे म्हणजे दुर्भाग्य असल्याची टिका प.स. सदस्य व सेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी केली आहे.अशाप्रकारे कोणाच्याही नोकऱ्या जाणार नसून फक्त हे येणारे दिवस कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही श्री धुरी यांनी केले प्रसिद्धी प्रकाद्वारे केले आहे.