लस घेतलेल्यांना सेल्फी पाॅईंटची उभारणी.;नगरसेवक यतीन खोत यांच्या संकल्पनेतील उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद….

लस घेतलेल्यांना सेल्फी पाॅईंटची उभारणी.;नगरसेवक यतीन खोत यांच्या संकल्पनेतील उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद….

मालवण /-


कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत नागरिकांमधील नकारात्मकता दूर व्हावी, कोरोनाची भीती दूर व्हावी आणि जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी या उद्देशाने नगरसेवक यतीन खोत यांनी स्वखर्चाने मामा वरेरकर नाट्यगृहात सेल्फी पॉइंटची उभारणी केली आहे. मी लस घेतलंय, तुम्ही पण घेवा ! मास्क वापरा आणि सुरक्षित अंतर ठेवा !! असा खास मालवणीतून संदेश दिला आहे.

मालवणात सध्या लसीकरणाची मोहिम राबविली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर पालिकेचे माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्या संकल्पनेतून मामा वरेरकर नाट्यगृह येथील लसीकरण केंद्राच्या बाहेर लस घेतलेल्यांसाठी सेल्फी पॉइंटची उभारणी केली आहे. पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृह येथील लसीकरण केंद्राच्या बाहेर हा सेल्फी पॉइंट उभारण्यात आला आहे. या उपक्रमाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. आज नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील, नगरसेवक यतीन खोत, बांधकाम सभापती मंदार केणी, श्री. गावीत, यशवंत गावकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..