वेंगुर्ले येथे जलजीवन मिशन कार्यक्रम व कोरोना आढावा बैठक संपन्न..

वेंगुर्ले येथे जलजीवन मिशन कार्यक्रम व कोरोना आढावा बैठक संपन्न..

वेंगुर्ला /-


जलजीवन मिशन कार्यक्रम व कोरोना आढावा बैठक शुक्रवारी सायंकाळी येथील पंचायत समितीच्या सभागृहात जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी बांधकाम समिती सभापती चव्हाण, समाज कल्याण समिती सभापती अंकुश जाधव, जिल्हा परिषद सदस्य विष्णुदास उर्फ दादा कुबल,वेंगुर्ले पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी, गट विकास अधिकारी उमा पाटील, जि. प. ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी पाताडे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अभियंता प्रफुल्लकुमार शिंदे आदी उपस्थित हाते.तसेच तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक ऑनलाईन उपस्थित होते. तालुक्यातील सर्व सरपंच व ग्रामसेवक यांनी आपआपल्या भागातील जलजीवन मिशन कार्यक्रमातील कामांचे परिपूर्ण प्रस्ताव येत्या दहा दिवसात द्यावेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा लवकरात लवकर कोरोनामुक्त होण्यासाठी सर्वांनीच सहकार्य करावे, असे आवाहन जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांनी वेंगुर्ले येथे झालेल्या जलजीवन मिशन कार्यक्रम व कोरोना आढावा बैठकीत केले.यावेळी त्यांनी येथील आरोग्य विभागा कडून वेंगुर्लेतील कोरोना स्थितीची माहिती घेतली.

अभिप्राय द्या..