वैभववाडीत लसिकरणास झालेल्या गर्दीमुळे आरोग्य विभाग हतबल…

वैभववाडीत लसिकरणास झालेल्या गर्दीमुळे आरोग्य विभाग हतबल…

वैभववाडी /-

सध्या सगळीकडे कोरोनाविषयीचे लसिकरण चालू झाले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी लसिकरणासाठी नागरीकांची गर्दी झालेली दिसून येत आहे. वैभववाडी येथेही लसिकरणासाठी नोंदणी केलेले नागरिक सकाळी 9 ते 11 या एकाच वेळी उपस्थित राहिल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं. त्यात वैभववाडी तालुक्यात कोवॅक्सिन व कोविशिल्ड अशा दोन लस उपलब्ध झाल्याने आणि कोवॅक्सिन लसिकरण अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी येथे तर कोविशिल्ड चे लसिकरण ग्रामीण रुग्णालयात सुरू करण्यात आले. त्यामुळे आपली लस कोणती हे माहीत नसल्याने ग्राहक संभ्रमात पडले. परिणामी ग्रामीण रुग्णालय परिसरात गोंधळ उडाला. त्यामुळे 10 वाजता लसिकरणाला सुरुवात झाली.

ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केलेल्या वेळेनुसार लसिकरणाचा लाभ घेवून गर्दी न करता नागरिकांनी सहकार्य करावे, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. धर्मे, डॉ. सोनवणे व तालुका नोडल अधिकारी अनिल पवार यांनी आवाहन केले आहे.

अभिप्राय द्या..