वेंगुर्ला /-
वेंगुर्ला तालुक्यात दिवसागणिक कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संख्येत जोरदार वाढ होत असून आज गुरुवारी आलेल्या अहवालात तब्बल ६३ व्यक्ती कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये आरवली येथे ३१,सोनसुरे १०,उभादांडा ७,रेडी २,शिरोडा २,दाभोली १,परबवाडा २,न्हईचीआड १ आणि वेंगुर्ले शहर एरियात ७ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.
दरम्यान आरवली टेमवाडी आणि देऊळवाडी इथे जास्त कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्या असून दोन्ही एरिया कंटेंटमेंट झोन करुन सिल करण्यात आले आहेत.