वेंगुर्ले तालुक्यात जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर कडकडीत बंद..

वेंगुर्ले तालुक्यात जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर कडकडीत बंद..


वेंगुर्ले तालुक्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वेंगुर्लेवासीयांकडून आज पासून सुरु करण्यात आलेल्या जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.दरम्यान शहरातील मुख्य नाक्यावर व प्रवेशद्वारावर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरात येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी सुरू होती.आमदार दिपक केसरकर व प्रशासनाकडून केलेल्या आवाहनानंतर वेंगुर्लेमध्ये आज गुरुवार ६ मे पासून कडक जनता कर्फ्यू पाळण्यात आला.आज पासून दहा दिवस १५ मे पर्यंत त्याची अंमलबजावणी होणार आहे. शहरातील पेट्रोलपंप व मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद आहेत.

अभिप्राय द्या..