Category: इतर

🛑मी.सुरू केलेली विकास कामे पूर्ण होत नसल्याने मी.शिवसेनेत प्रवेश केला.;महेश कांदळगावकर.* *_▪️मालवण कुंभारमाठ येथे शिंदे शिवसेनेचा मेळावा संपन्न.._* *✍🏼लोकसंवाद /- मालवण.* मी नगराध्यक्ष म्हणून पाच वर्षात सुरु केलेली कामे पुढे सरकत नव्हती हे माझे शिवसेनेत सक्रिय होण्यामागे किंवा प्रवेश करण्यामागे कारण होते.मी काही माझी वैयक्तिक कामे केली नाहीत तर मालवण शहराच्या विकासासाठी कामे केली.मात्र मला त्यावेळी सहकार्य मिळत नव्हते, असे प्रतिपादन मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी कुंभारमाठ येथे शिवसेना मेळाव्यात बोलताना केले. मालवण कुंभारमाठ येथे शिंदे शिवसेनेचा मेळावा संपन्न झाला. त्यावेळी महेश कांदळगावकर हे बोलत होते. यावेळी महायुतीचे उमेदवार निलेश राणे, शिवसेना जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, तालुकाप्रमुख राजा गावकर, बबन शिंदे आदी व इतर उपस्थित होते.यावेळी महेश कांदाळगावकर म्हणाले, मी मालवण नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली ती शिवसेना भाजप युतीमधून लढवली. मला निवडून देण्यामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जेवढी मदत केली, तेवढीच मदत भाजपच्याही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली होती. त्यामुळे पद मिळू शकले. त्यावेळी माझे चिन्ह धनुष्यबाण होते, आणि आजही धनुष्य बाण चिन्ह आहे. त्यामुळे मी कुठच्या पक्षाशी प्रतारणा केली नाही. मी दुसऱ्या कुठल्य पक्षात गेलो नव्हतो.मला शिवसेनेत सक्रिय करून घेतल्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो, असेही ते म्हणाले. नगरपालिकेतील प्रशासक कामे करत नसल्याने विकासकामे रखडली. शहरातील स्वच्छता मोहीम फक्त फोटो सेशन पूरती राहिली, लोकांचे आरोग्याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. फोवकांडा पिंपळ येथील गार्डनची दुरावस्था झाली. मालवण शहरातील भुयारी गटार योजनेसाठी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलो तेव्हा योजनेसाठी कर्ज काढावे लागेल असे सांगण्यात आले. त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मध्यस्थी करत कर्ज नाही तर अनुदान प्राप्त करून दिले. पाणी पुरवठा योजना देखील महायुती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केली. तर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात या योजनेची निविदा प्रक्रिया झाली, असेही कांदळगावकर म्हणाले. राज्यातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेसारखी चांगली योजना राबवली आहे, यामुळे महिलांचे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. महायुतीची कामे भरमसाठ आहेत. त्यामुळे निवडणूक प्रचारात या कामांसह लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना झालेले फायदे लोकांपर्यंत पोहचवले पाहिजे. केंद्रात भाजप महायुतीची सत्ता आहे, आता राज्यातही महायुतीची सत्ता येणे गरजेचे आहे. राज्यात महायुती सरकार आल्यास केंद्रात दादा आणि राज्यात निलेश दादा अशी स्थिती होणार आहे. त्यामुळे गावागावतील विकास कामासाठी निधी येणार आहे, निलेश राणे यांना मी मताधिक्याच्या शुभेच्छा देतो, असेही महेश कांदळगावकर म्हणाले.

मी.सुरू केलेली विकास कामे पूर्ण होत नसल्यानेकमी.शिवसेने प्रवेश केला.महेश कांदळगावकर. ▪️मालवण कुंभारमाठ येथे शिंदे शिवसेनेचा मेळावा संपन्न. *✍🏼लोकसंवाद /- मालवण.* मी नगराध्यक्ष म्हणून पाच वर्षात सुरु केलेली कामे पुढे सरकत…

🛑 मी.सुरू केलेली विकास कामे पूर्ण होत नसल्याने मी.शिवसेनेत प्रवेश केला.;महेश कांदळगावकर.

▪️मालवण कुंभारमाठ येथे शिंदे शिवसेनेचा मेळावा संपन्न.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. मी नगराध्यक्ष म्हणून पाच वर्षात सुरु केलेली कामे पुढे सरकत नव्हती हे माझे शिवसेनेत सक्रिय होण्यामागे किंवा प्रवेश करण्यामागे कारण…

🛑कुडाळ,सावंतवाडी,वेंगुर्लेसह सिंधुदुर्गात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस,शेतकरी व बागायतदार चिंतेत.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदूर्ग. आज ढगांच्या गडगडाटासह सिंधुदुर्गात पाऊस कोसळला. परतीचा पाऊस लांबल्याने दिवाळीच्या तोंडावर गुलाबी थंडीची चाहूल लागली नाही तसेच शेतकरी व बागायतदार चिंतेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून संध्याकाळी विजांचा…

🛑महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी घेतले श्री देव लक्ष्मी नारायणाचे दर्शन..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या वालावल येथील तीर्थक्षेत्र श्रीदेवी लक्ष्मीनारायण मंदिर येथे महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी देवतांचे दर्शन घेतले.यावेळी त्यांच्या समवेत देवस्थानचे महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष…

🛑 अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर बांबूने हल्ला हल्ला..

▪️पाठलाग करुन सहकाऱ्यासह स्थानिक लोकांनी हल्ले खोराला घेतले ताब्यात. ✍🏼लोकसंवाद /-सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील नरकासुर स्पर्धा आटोपून माघारी परतत असताना सावंतवाडी मळगाव स्टेशनजवळ अपक्ष विधानसभा उमेदवार विशाल परब यांच्या…

🛑स्पंदना स्फूर्ती फायनान्सचे कर्ज अधिकारी दिलीप पाटील यांच्या विरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ येथील स्पंदना स्फूर्ती फायनान्स शाखेचे कर्ज विभागाचे अधिकारी दिलीप राजाराम पाटील यांनी ५ लाख ४७ हजार ६३५ रुपयांचा आर्थिक अपहार केल्याची तक्रार झोन मॅनेजर उमेश मारोराव…

🛑दोडामार्गमद्धे दोन सॉमिलवर वनविभागाकडून कारवाई..

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. अवैध्य लाकूड साठा आढळल्या प्रकरणी दोडामार्ग तालुक्यातील दोन सॉमिलवर वनविभागाकडून कारवाई करण्यात आली. तसेच हे दोन्ही सॉमिल सील करून संबंधित मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे…

🛑वाजराठ येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या विशेष पथकाने पकडली गोवा बनावटीची दारू..

▪️सुमारे ५ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या गस्तीसाठी असलेल्या विशेष पथकाने वजराट तिठा येथे स्विफ्ट कारमधून वाहतूक करण्यात…

🛑मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यामुळे सामाजिक सेवाभावी ग्रृप गोठोस यांच्या वतीने मराठी उजळणीचे केले वाटप..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील गोठोस येथील सामाजिक सेवाभावी ग्रृप यांच्या वतीने नुकतेच केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने सर्वच स्तरातून याचे कौतुक होताना दिसत आहे.याच पाश्वभूमीवर गोठोस गावातील…

🛑उद्धव ठाकरे यांनी कितिही पाळीव प्राणी सोडुदेत आमची महायुती भक्कम आहे.;आ.नितेश राणे..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. उद्धव ठाकरे थेट राणेंवर बोलू शकत नाही त्यामुळे आमचीच माणसं फोडून आमच्या विरोधात उभा करण्याचा षडयंत्र रचत आहेत मात्र त्यांनी कितीही पाळीव प्राणी आमच्यावर सोडले तरी आम्हाला…

You cannot copy content of this page