मालवण /-
ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गच्या पायाभरणीचा ३५६ वा वर्धापन दिन किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीतर्फे आज दांडी येथील मोरयाचा धोंडा याठिकाणी साजरा करण्यात आला.
किल्ल्याच्या पायाभरणीचा वर्धापन आज सकाळी मोरयाचा धोंडा येथे किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्यावतीने गणेश पूजन करून साजरा करण्यात आला. डॉ. रामचंद्र काटकर यांचा हस्ते पुजा करण्यात आली. यावेळी दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी देण्यात आलेल्या जय शिवाजी जय भवानी, हर हर महादेव घोषणानी परिसर शिवमय झाला.
यावेळी समितीचे सचिव विजय केनवडेकर, उपाध्यक्षा ज्योती तोरसकर, दत्तात्रय नेरकर, भाऊ सामंत, प्रदिप वेगुर्लेकर, चिंतामणी मयेकर, दिपाली नेरकर, सतिश चांदेरकर, निखिल नेरकर, रजत तोरसकर आदी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जानभट अभ्यकर यांच्याकडून पायाभरणी पूजा करून घेतली होती. त्या अभ्यंकरांच्या सहाव्या पिढीतील किरण आपटे यांनी पौराहित्य केले.