नेतर्डे – गावठणवाडी येथे जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत यांच्या पुढाकाराने निर्जंतुकीकरण .
सावंतवाडी /-
सिंधुदूर्ग जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची व मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नेतर्डे गावचे सुपुत्र तसेच जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत यांनी नेतार्डे – गावठणवाडी येथे कोरोनाच्या साथीने नागरिक मृत झाल्याने त्वरीत या रेड झोन मध्ये निर्जंतुकीकरण फवारणीचा निर्णय ,घेऊन सावंतवाडी येथील संजू विरनोडकर टीमला तातडीने बोलाऊन घेतले…
गावठणवाडी येथे बारा कोरोना बाधित रुग्ण व एकाचा दुर्दैवी मृत्यु झाल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले होते. परंतु विरनोडकर टीमने कोरोना प्रतिबंधक उपक्रम राबल्याने नागरिकांनी प्रमोद कामत तसेच संजू विरनोडकर यांना धन्यवाद देत आशीर्वाद दिले…
नेतर्डे गावात कोरोना प्रादुर्भाव अधिक पसरू नये याच साठी रेड झोन मध्ये बाधीतांच्या संपुर्ण घरात धाडसी व रेड झोन मधील घरोघरी आजूबाजूचा पूर्ण परिसर निर्जंतुकीकरण फवारणी करून घेत संजू विरनोडकर टिंमने सामाजिक बांधिलकी जोपासली…….
संजू विरनोडकर टीम गेले वर्षभर जिल्ह्यात रेड झोनमध्ये जाऊन कोरोना प्रतिबंधक फवारणी करत असल्याने प्रमोद कामत तसेच गावाकडील ज्येष्ठानी विरनोडकर टीमच्या कामाचे कौतुक केले. या उपक्रमात मध्ये कामत यांनी स्वतः सहभाग दर्शवला या टिमचे सागर मळगावकर, तसेच गावातील युवकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते… यावेळी जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत, कैलास गवस, संदीप कोरगावकर,सागर मळगावकर, राजन कोरगावकर, दादा देवकर, प्रशांत कामत आदी सहभागी झाले होते…