राष्ट्रभक्ती निर्माण करणार्‍या बलोपासना सप्ताहाला युवकांचा वाढता प्रतिसाद..

राष्ट्रभक्ती निर्माण करणार्‍या बलोपासना सप्ताहाला युवकांचा वाढता प्रतिसाद..

हिंदू जनजागृती समितीच्या वतीने रामनवमी ते हनुमान जयंती या कादुलावधीत ऑनलाईन कार्यक्रम

सिंधुदुर्ग – हिंदु जनजागृती समितीच्या वताने रामनवमी ते हनुमान जयंती या कालावधीत ऑनलाईन बलोपासना सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. युवक-युवतींमध्ये राष्ट्राभिमान जागृत व्हावा तसेच श्रीराम आणि हनुमान यांची भक्ति करून स्वत:त भक्तीभाव निर्माण व्हावा या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात येत आहे. या उपक्रमाला जिल्हाभरातून ५५ युवक-युवती जोडत असून चांगला प्रतिसाद लाभत आहे.
प्रतिदिन पहाटे ६ ते ७ या वेळेत होणार्या बलोपासना वर्गामध्ये प्रारंभी श्रीरामाचा सामुहिक नामजप घेतला जातो. त्यानंतर शारिरीक व्यायाम प्रकार, श्रीरामाच्या जीवनातील बोधप्रद प्रसंगांचे श्रवण आणि शेवटी हनुमंताचा नामजप अशा क्रमाने वर्ग पूर्ण होतो. बलोपासना वर्गामुळे एकाग्रता वाढणे आत्मविश्वास निर्माण होणे शारिरीक क्षमता विकसित होणे गुणवृद्धी होणे असे अनेक लाभ होत असल्याचे वर्गातील युवांनी कळवले आहे.
काळानुसार साधना या साधनेतील तत्वाला अनुसरून आज कोरोना संक्रमणाचे संकट आणि ताणतणावाने भरलेल्या जीवनात बलोपासनेतून होणार्या साधनेची पुष्कळ आवश्यकता आहे. हिंदू संघटन, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती हे हिंदु जनजागृती समितीचे मुख्य कार्य आहे. ऑनलाईन धर्मशिक्षण वर्ग, बालसंस्कार वर्ग, धर्मसंवाद या माध्यमांतून धर्मप्रसाराचे कार्य चालू आहे. या सर्वच उपक्रमांना जिज्ञासूंचा दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत आहे.

अभिप्राय द्या..