कुडाळ /-
जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय कार्यात आपला वेगळा ठसा उमटवणारे व मातृभाषा संवर्धनासाठी कार्यरत असणारे सामाजिक कार्यकर्ते श्री अमर घाडी यांची माय मराठी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक पदी फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष श्री मंगेश मिस्किन यांनी पत्राद्वारे नियुक्ती केली. मराठी भाषेचे संवर्धनाकरीता व सामाजिक कार्य याकरिता दिलेल्या योगदानाची दखल घेत फाउंडेशन ने जी जबाबदारी दिली तिला नक्कीच प्रामाणिक व योग्य न्याय देण्याचा सर्वोत्तपरी प्रयत्न करू असे श्री अमर घाडी यांनी आभार व्यक्त करताना मत मांडले.