कणकवली /-
कोव्हीड काळात वारेमाप खोटी आश्वासने देणाऱ्या पालकमंत्री उदय सामंत यांना गझनी रोग झाल्याची घणाघाती टीका आमदार नितेश राणे यांनी केली. कोव्हीड काळात सरपंचाना विमा संरक्षण देण्याची घोषणा गतवर्षी पालकमंत्र्यांनी केली होती. ती हवेतच विरली. काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी ग्राम सनियंत्रण समिती पुन्हा ऍक्टिव्ह केली आहे.कोरोना शी लढा देताना गावच्या सरपंचावर मोठी जबाबदारी असते. त्या सरपंचानाच विमा संरक्षणाचे खोटे आश्वासन देऊन आणि जम्बो कोव्हीड केअर सेंटर उभारण्याची खोटी घोषणा करणाऱ्या पालकमंत्री सामंत याना गझनी रोग झाल्याची टीका आमदार नितेश राणे यांनी कणकवलीत केली.पालकमंत्री सिनेमातील डायलॉग प्रमाणे जनतेला आश्वासने देत सुटताहेत. कारण कला क्षेत्राशी त्यांचा नजीकचा संबंध असल्याची कोपरखळी ही आमदार नितेश यांनी लगावली.