कुडाळ /-
सद्ध्या करोना चा प्रादुर्भाव वाढत असताना जिल्हया मध्ये एसटी प्रशासन, कामगार आणि लोकांच्या जिवाशी खेळायचा जणू बाजार मांडलेला आहे
पंधरा दिवसा मध्ये स्वब टेस्ट करून निगेटिव्ह प्रमाण पत्र मिळाल्यास तरच त्यानं ड्युटी करावयाची आहे, पण सध्या अनेक कर्मचारी हे कुठली ही टेस्ट न करता, सरळ ड्युटी वर हजार होऊन काम करत आहेत, ह्या गोष्टींवर कोणाचे ही नियंत्रण दिसत नाहीं आहे.जिल्हाधिकारी,तसेच पोलीस अधीक्षक ह्यांनी तात्काळ ह्या गोष्टीची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाही करावी महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहनला जर आपल्या परीने निर्णय घ्यावा लागला तर रस्त्या वर गाड्या अडवून तसेच डेपोत फिरून सगळ्यांच्या टेस्ट करून घ्याव्या लागतील, आणि त्यात कोण पोसिटीव्ह आढळल्यास त्याची संपूर्ण जवाबदारी ही विभाग नियंत्रका वर तसेच सर्व डेपो मॅनेजर वर राहणार असून जर का कुठल्याही कसूररामुळे जर कामगारांवर तसेच प्रवाश्यांना करोना झाल्यास महाराष्ट्रा नवनिर्माण राज्य परिवहन सेना, ह्या वरील सर्वांवर गुन्हा दाखल करणार आहे असे महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य परिवहन उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी मीडिया शी बोलतात सांगितले.