कुडाळ /-
बाहेर फिरणाऱ्यांना लगाम लागावा व चेन द ब्रेक यशस्वी होण्यासाठी कुडाळ पोलिस,आरोग्य विभाग व नगरपंचायत प्रशासन यांच्यावतीने रस्त्यावरच रँपिड टेस्ट करण्याची मोहीम आजपासून सुरू करण्यात आली आहे.आज २०० जणांची टेस्ट करण्यात आली त्यातील २ जण पाॅझीटिव्ह आढळले.आता रोज अशी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.