वेंगुर्ले /-
वेंगुर्ला – तालुक्यातील उभादांडा येथील समुद्र किनारी सोमवारी ऑलिव्ह रिडले कासवाच्या घरट्यातून बाहेर पडलेल्या कासव पिल्लांना वेंगुर्लेचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विनायक पाटील यांच्या हस्ते नैसर्गिक सागरी अधिवासात सोडण्यात आले.
उभादांडा समुद्रकिनारी मार्च महात ऑलिव्ह रिडले कासवाने लावलेल्या घरट्यातून सोमवारी या घरट्यातून ८३ कासव पिल्ले बाहेर आली. सदर कासव पिल्लांना पहावयास आलेले वेंगुर्ल्याचे दिवाणी न्यायाधीश वि.द.पाटील यांच्या हस्ते त्या सर्व कासव नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. यावेळी सावंतवाडी येथील उपवनसंरक्षक एस. बी. नारनवर, वनपाल अण्णा चव्हाण, वनरक्षक विष्णू नरळे,तुळस वनरक्षक एस.एस.कांबळे तसेच घरटे संरक्षण करणारे मनवेल बागायतकर यांच्यासह ग्रामस्थ वैभव हळदणकर, उद्धव चिपकर, तेजस गोवेकर, रोहन आरोलकर आदी उपस्थित होते.