सिंधुदुर्ग /-
जिल्ह्यातील काजूला अपेक्षित भाव मिळावा यासाठी जिल्ह्यातील काजू उत्पादक, प्रक्रिया व्यावसायिक यांची सोमवारी बैठक झाली. या बैठकीत साधक बाधक चर्चा होवून १८ सदस्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. समन्वय समितिची पहिली बैठक शुक्रवारी ९ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यानी दिली.
सिंधूदुर्गनगरी येथील जिल्हा बँक प्रधान कार्यालयात ही बैठक संपन्न झाली. यावेळी आ वैभव नाईक, बँक संचालक प्रकाश मोर्ये, व्हीक्टर डांटस, जिल्हा दूध उत्पादक संघ अध्यक्ष एम के गावडे आदी उपस्थित होते. बैठकीनंतर सतीश सावंत यानी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. यावेळी पुढे बोलताना सावंत यानी, संदीप राणे या समितीचे समन्वयक आहेत. विलास सावंत, दिवाकर म्हावळणकर, विजय सावंत, बाळकृष्ण गाडगीळ, अभिजीत पवार, प्रदीप तळेकर, चंद्रशेखर सावंत, लक्ष्मण नाईक, डॉ प्रसाद देवधर, सुधीर झाट्ये, बाबल नाईक, विलास देसाई, सखाराम ठाकुर, विलासउ बटाने, सतीश पालव, दीपक चव्हाण आदी सदस्यांचा समावेश आहे.