आचरा /-
मोबाईलच्या अती वापराने युवा पिढी आपले स्वास्थ हरवत चालली आहे.अशा पिढीला मैदानी खेळांची आवड निर्माण करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन होत राहिल्या पाहिजेत.या मैदानी खेळातूनच युवकांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होईल असे मत आचरा गावचे माजी सरपंच आणि विचारवंत शशांक मिराशी यांनी आचरा वरची वाडी येथे व्यक्त केले.
बालगोपाल मंडळ आचरा वरची वाडी तर्फे आयोजित रात्रीच्या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या वेळी त्यांच्या सोबत व्यासपीठावर आचरा सरपंच प्रणया टेमकर, मंडळाचे अध्यक्ष विलास आचरेकर, माजी सरपंच मंगेश टेमकर, जयप्रकाश परूळेकर, जगदीश पांगे मालवण तालुका पत्रकार समिती उपाध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, ग्रामपंचायत सदस्या वृक्षाली आचरेकर, मंदार सरजोशी,यश मिराशी, वामन आचरेकर, बबन शेट्ये,भाई लाड, पंकज आचरेकर, रामदास आचरेकर,विजय लाड, मंदार आचरेकर, महेश शेट्ये, किशोर आचरेकर, संजय आचरेकर,महेंद्र आचरेकर,उदय लाड,दिपक आचरेकरयांसह बालगोपाल मंडळाचे बहुसंख्य कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
या वेळी मालवण तालुका पत्रकार समिती उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मंडळाच्या वतीने पत्रकार अर्जुन बापर्डेकर यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना सरपंच प्रणया टेमकर यांनी बालगोपाल मंडळाच्या वतीने राबविण्यात येणार विविध कार्यक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले.सुत्रसंचलन मारुती आचरेकर यांनी केले तर आभार रामदास आचरेकर यांनी मानले.
फोटो–
क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करताना जयप्रकाश परूळेकर सोबत शशांक मिराशी, सरपंच प्रणया टेमकर, मंगेश टेमकर, अर्जुन बापर्डेकर आदी